हे गुरुराया, जाणिले तुम्हास मी, आपणच आहात भगवंत ।
करित आहात उद्धार साधकांचा, होऊनी कृपावंत ॥ १ ॥
कनवाळू आपण, नाही आपल्या प्रीतीला अंत ।
कसा येऊ आपल्या चरणांपाशी, लागली मजला खंत ॥ २ ॥
साहाय्यासाठी दिधले साधनेत सद्गुरु आणि संत ।
परि द्या मजसी बळ करण्या साधना परिपूर्ण, येण्या आपल्यापर्यंत ॥ ३ ॥
या काव्यपंक्ती श्री गुरुमाऊलीच्या कृपेने सुचल्या आहेत. त्यामुळे मी ही प्रार्थना त्यांच्या चरणी समर्पित करून कृतज्ञता व्यक्त करतो.
– आपला नम्र, श्री. कृष्णकुमार जामदार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.१०.२०२०)