कोल्हापूर शहरात गारांचा वर्षाव

गारांचा पाऊस

कोल्हापूर, २९ एप्रिल (वार्ता.) – अनेक दिवसांच्या उकाड्यानंतर त्रस्त झालेल्या कोल्हापुराकरांना २९ एप्रिल या दिवशी सायंकाळी ५ वाजता गारांच्या वर्षावाचा आनंद लुटला. कोरोनामुळे लागू असलेल्या दळणवळण बंदीमुळे घरीच असलेल्या बाळ-गोपाळांसह नागरिकांनी गारा खाल्या. गेले दोन-तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी गारांचा पाऊस पडत होता; मात्र शहराला तो हुलकावणी देत होता. अखेर २९ एप्रिल या दिवशी वादळी वार्‍यासह गारांच्या पावसाने कोल्हापूर चिंब भिजले. मोठ्या प्रमाणात पडलेल्या आणि मोठ्या आकाराच्या गारांमुळे काही काळ रस्तेही पांढरे शुभ्र झाले होते.