इंदापूर (पुणे) येथे अवैध ऑक्सिजन साठा जप्त, भरलेले ५१ सिलिंडर ताब्यात !

ऑक्सिजन सिलिंडर

पुणे, २९ एप्रिल – इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील एम्.आय.डी.सी.मधील वाय अ‍ॅक्सिस स्ट्रक्चरल स्टील प्रा. लि. या आस्थापनात इंदापूर पोलिसांनी धाड टाकत ७ लाख ५५ सहस्र ७०० रुपयांचा अवैध ऑक्सिजन साठा जप्त केला. हा ऑक्सिजन संबंधित आस्थापनाने सिलिंडरमध्ये भरून ठेवला होता. त्यात ऑक्सिजन भरलेले ५१ सिलिंडर आणि २१ रिकामे सिलिंडर घटनास्थळावरून जप्त केल्याची माहिती इंदापूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली.

आस्थापनात चालू आर्थिक वर्षात एप्रिलमध्ये १७९ सिलिंडरची आवक झाल्याची नोंद सापडली. या कारवाईची माहिती प्रभारी तहसिलदार अनिल ठोंबरे यांना देण्यात आली आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.