पुणे – राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने संचारबंदी लागू केली आहे, मात्र शहरात संचारबंदीच्या नियमांची पायमल्ली होत आहे. शिवाजीनगर येथील जनवाडी येथे अरुण कदम चौकात बंदीच्या वेळेतही दुकाने चालू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सामाजिक सुरक्षित अंतराचे पालन न करणे, मास्क न वापरणे या कारणांसाठी घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून सप्टेंबर २०२० ते आजपर्यंत ३ सहस्र ५५७ घटनांमधून १८ लाख रुपये दंड वसूल केला आहे. नागरिकांनी नियमांचे गांभीर्याने पालन करावे; तसेच व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक तुषार राऊत यांनी आवाहन केले आहे.