पुणे, २९ एप्रिल – कोरोना प्रतिबंधक लस संपल्यामुळे २८ एप्रिल या दिवशी शहरातील सर्वच लसीकरण केंद्रे अनिश्चित कालावधीसाठी बंद झाली आहेत. ज्या केंद्रांमध्ये कोवॅक्सिनचा साठा आहे, त्याच केंद्रांवर लसीकरण काही प्रमाणात चालू आहे. लसीचा साठा उपलब्ध होण्याविषयी अनिश्चितता आहे. शहरात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण चालू आहे. नागरिकांच्या लसीकरणासाठी जेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध व्हायला हवी तेवढ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक केंद्रावर भ्रमणभाषवरून माहिती दिली जात नाही, तसेच केंद्रांवर कर्मचार्यांशी वादाचे प्रसंगही घडत आहेत.