पुस्तके घरपोच वितरण करण्यास परवानगी द्या ! – मराठी प्रकाशक संघाची मागणी

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – केरळच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही पुस्तकांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करावा आणि दळणवळण बंदीच्या काळात पुस्तकांचे घरपोच वितरण करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. दळणवळण बंदीमुळे पुस्तक विक्री आणि प्रकाशन व्यवसाय आर्थिक अडचणीत आला असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. कागद हा कोरोना विषाणूचा वाहक नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केल्याने येत्या १ मेपासून चालू होणार्‍या नवीन दळणवळण बंदीमध्ये पुस्तक वितरणासाठी सूट मिळावी, अशी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची मागणी असल्याचे बर्वे यांनी सांगितले.