सातारा जिल्ह्यातील ‘ऑक्सिजन बेड’साठी ५० लाख रुपयांचा निधी !
जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांसाठी ५० लाख रुपयांचे १८० ‘ऑक्सिजन बेड’ उपलब्ध होणार आहेत. आमदार शशिकांत शिंदे यांच्या मागणीवरून पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हा नियोजन समितीमधून ही तरतूद केली आहे.