कणकवली – कोरोना महामारीच्या काळात सर्व फार्मासिस्ट (किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेते), तसेच त्यांचे कर्मचारी जिवाची बाजी लावून काम करत आहेत. काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. आता कोरोनाची दुसरी लाट आलेली असून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील सर्व फार्मासिस्ट आणि त्यांचे कर्मचारी यांना कोविड लस प्राधान्याने मिळावी, अशी मागणी ‘सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन’च्या वतीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
पालकमंत्री सामंत यांना निवेदन देतांना असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम, सचिव संजय सावंत, माजी जिल्हाध्यक्ष नंदू उबाळे आणि अमर गावडे हे उपस्थित होते.