देवगड – मत्स्य विभागाच्या वतीने १७ एप्रिलला सकाळी देवगड समुद्रात गस्त घालत असतांना तारामुंबरी मिठमुंबरी समुद्रात कर्नाटक राज्यातील ‘जय माता’ ‘हायस्पीड ट्रॉलर’ जाळी टाकून अनधिकृतपणे मासेमारी करत असल्याचे आढळले. या ट्रॉलरला मत्स्य विभागाच्या अधिकार्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र ट्रॉलर पळून जात होता.
या वेळी मत्स्य विभागाच्या ‘शीतल’ या गस्ती नौकेने पाठलाग करून थांबवण्याचा प्रयत्न केला, तरीही ट्रॉलर थांबत नसल्याने अखेर गस्ती नौकेवरील पोलीस नाईक नीलेश पाटील यांनी या ट्रॉलरवर पिस्तूल रोखले. त्यानंतर खलाशांनी ट्रॉलर थांबवला अन् शरणगती पत्करली. या वेळी सागर सुरक्षा रक्षक संदेश नारकर, योगेश फाटक, अजित बांदकर, हरेश्वर खवळे, धाकोजी खवळे, संतोष टूकरूल यांनी हा ट्रॉलर आणि तांडेल यांच्यासह ७ खलाशांना कह्यात घेतले, अशी माहिती मत्स्य परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर यांनी दिली.