महाशिवरात्र

एक निर्दयी आणि महापापी व्याध होता. एके दिवशी तो मृगयेसाठी निघाला असतांना वाटेत त्याला शिवाचे देऊळ दिसले. तो महाशिवरात्रीचा दिवस असल्याने त्या ठिकाणी भक्त पूजा, भजन, कीर्तन करत असलेले त्याने पाहिले.

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी साधकांशी बोलण्याच्या संदर्भात केलेले मार्गदर्शन !

जे शाश्‍वत नाही, त्याच्याशी संबंध ठेवल्याने आपण जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकतो. माया म्हणजे ‘जी नाही.’ तिच्याशी संबंध ठेवल्यामुळे आपण स्वप्नवत् अवस्थेत रहातो. आपल्याला त्यापासून काही प्राप्त होत नाही.

शिवोपासनेची वैशिष्ट्ये आणि शास्त्र

शिवालयात असणारा नंदी हे शिवाचे वाहन आहे. शिवपिंडीचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घ्यावे. नंदीचे दर्शन घेतल्याने सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. यामुळे नंतर पिंडीचे दर्शन घेतांना, भक्ताला शिवाकडून येणार्‍या शक्तीशाली लहरी पेलण्याची क्षमता प्राप्त होते.

लाभावेत आपले प्रीतीमय आशीष आम्हा साधकांना ।

बाबा, मुक्त करा हो, माझ्या या मायेच्या बंधना ।
शुद्ध करा हो, आता अंतरीच्या दलदलीला ॥

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाच्या स्वयंपाकघरातील श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीचा किरणोत्सव !

मद्दरलक्कमा (श्री महालक्ष्मी) या देवीच्या आज्ञेनुसार सनातनचे आश्रम, तसेच संत यांच्या रक्षणासाठी सप्तशतीचा पाठ आरंभ करताच, आश्रमाच्या स्वयंपाकघरातील श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीचा किरणोत्सव होणे, ही देवीने तिच्या कृपेची दिलेली प्रचीतीच होय.

भस्माची शिकवण

मनुष्याने आपली आहुती देऊन भस्म होणे, म्हणजे आपल्या इच्छा-आकांक्षा, दोष, अज्ञान अन् अहं यांचा त्याग करणे आणि मनाची शुद्धता प्राप्त करणे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात, तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

महाशिवरात्रीला शिवपिंडीवर अभिषेक केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होणे

‘महाशिवरात्रीला शिवपिंडीवर अभिषेक केल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

शिवाचे कार्य

जीव तपसाधनेने अग्नितत्त्व, यम, वरुण आणि वायुतत्त्व यांना ओलांडून मृत्युंजय अशा शिवतत्त्वाजवळ येतो. त्या वेळी शिव त्या जिवाला अभय देऊन र्ईश्‍वरी तत्त्वाच्या स्वाधीन करतो. त्या वेळी जीव आणि शिव एक होतात.