भस्माची शिकवण

मनुष्याने आपली आहुती देऊन भस्म होणे, म्हणजे आपल्या इच्छा-आकांक्षा, दोष, अज्ञान अन् अहं यांचा त्याग करणे आणि मनाची शुद्धता प्राप्त करणे.

‘मानवी देह नश्‍वर असल्याने मरणानंतर देहाची जळून राख होणार आहे. त्यामुळे देहासक्ती बाळगू नये. मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो. महत्प्रयासाने मिळालेला मनुष्यजन्म सार्थकी लावण्यासाठी आणि आपला प्रत्येक क्षण पवित्र अन् आनंददायी करण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे’, असे भस्म सूचित करते.