केंद्र सरकार आणि ट्विटर यांनी खोट्या बातम्या आणि भडकाऊ पोस्ट यांवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा बनवावी ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना ट्विटर आणि केंद्र सरकार यांना एक यंत्रणा बनवण्यास सांगितले असून त्याद्वारे खोट्या बातम्या (फेक न्यूज) आणि भडकाऊ पोस्ट यांना आळा घालता येईल.

भारतीय जातीच्या गायींच्या दुधाचे महत्त्व !

भारतीय जातीच्या गायींपासून मिळणार्‍या दुधामध्ये औषधीय तत्त्व (ओमेगा ३, ए २ प्रोटीन, केरोटिन) योग्य प्रमाणात असते. ते तत्त्व गायींसारखे दिसणारे विदेशी पशू आणि म्हैस यांच्या दुधामध्ये उपलब्ध नसते.

महापुरुषांचे नुसते प्रेमी किंवा भक्त न होता त्यांचे विचार आत्मसात करून कृतीशील व्हा ! – रणजीत सावरकर

श्रीराधाकृष्ण मंदिराजवळ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भित्तीचित्र साकारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन श्री. रणजीत सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

पाकच्या विरोधात लढणार्‍या गटाने केलेल्या आक्रमणात पाकचे ४ सैनिक ठार

पाकच्या सिंध, बलुचिस्तान, वजीरिस्तान, खैबर पख्तुनख्वा आदी प्रांतांमध्ये पाकच्या विरोधात लोकांकडून उठाव होत आहे. त्याचा परिणाम म्हणून पाकचे ६ तुकडे झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

अजित पवार यांनी आश्‍वासन न पाळल्याने खेळाडू परत करणार शिवछत्रपती पुरस्कार !

वर्षभरापूर्वी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याविषयी कार्यवाही करण्यात येईल, असे आश्‍वासन राज्य शासनाने दिले होते; मात्र अद्यापही ते पाळण्यात आले नसल्याने पुरस्कारप्राप्त खेळाडूंनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली.

पाकिस्तानमध्ये अहमदी डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या !

पाकमध्ये अहमदी समाजाला मुसलमान समजले जात नाही आणि त्यांचाही हिंदूंप्रमाणे वंशसंहार केला जात आहे, याविषयी जागतिक मानवाधिकार संघटना मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !

तरुणांनो, हिंदु संस्कृतीचे महत्त्व लक्षात घ्या !

हिंदु धर्मात प्रेमाला किंवा प्रेम व्यक्त करण्याला कधीही निषिद्ध मानलेले नाही. हिंदु धर्मात मानसिक स्तराच्या प्रेमाच्याही पुढे असलेल्या आध्यात्मिक स्तराच्या (निरपेक्ष प्रेमाला) श्रेष्ठ मानले जाते. प्रेमभाव असल्याविना प्रीती हा गुण विकसित करता येत नाही; मग हिंदु धर्म प्रेमाचा निषेध कसा करणार ?

पिंपरीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

समाजातील नैतिकता आणि माणुसकी हरवत चालल्याचे दर्शवणारी घटना !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिवजयंती उत्सव आरोग्याची काळजी घेऊन साजरा करा ! – पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

राज्यशासनाकडून शिवजयंती साजरी करण्याविषयी मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियोजन करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

जेजुरी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करू नये !

जुरीमध्ये पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते १३ फेब्रुवारीला होणार होते.