माघ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे त्रिस्तरीय नाकाबंदी

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कोरोनामुळे यंदाच्या वर्षी माघ यात्रा भाविकांविना साजरी करण्यात येणार आहे. या काळात सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी उभारली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी चैत्र वारी, आषाढी वारी, तसेच कार्तिकी वारी या मुख्य यात्रा होऊ शकल्या नाहीत.

कोरोनाचे संकट अद्यापही संपले नसल्याने आणि राज्य सरकारने कोरोनाचे नियम २९ फेब्रुवारीपर्यंत चालू ठेवल्याने यात्रा भरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यानुसार मंदिर समितीने २२ आणि २३ फेब्रुवारी या दिवशी श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग या भागांत १४४ कलम लागू करून संचारबंदीचा प्रस्ताव शासनाकडे दिल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.