सांगली महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेला उपग्रह रामेश्‍वर तेलंगणा येथून अवकाशात झेपावला

सांगली महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेला उपग्रह अवकाशात झेपावतांना

सांगली, ८ फेब्रुवारी – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेला उपग्रह रामेश्‍वर येथून अवकाशात झेपावला. तेलंगणाच्या राज्यपाल श्रीमती तमिलीसाई सौंदर्याराजन्, इस्रोचे माजी संचालक डॉ. ए. शिवथानू पिलाई, इस्रोचे संचालक पद्मश्री डॉ. मल्लयस्वामी अण्णादुराई उपस्थित होते. यानंतर ३ ते ५ घंट्यांच्या अंतराने निर्धारित वेळेत हा उपग्रह पुन्हा पृथ्वीवर परतला.

( सौजन्य : TV9 marathi )

या प्रसंगी सांगलीसह देशभरातील विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेल्या १०० उपग्रहांचेही प्रक्षेपण करण्यात आले होते. या वेळी देशभरातील शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी उपस्थित होते. हा उपग्रह सांगली महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणार्‍या १० विद्यार्थ्यांनी सिद्ध केला आहे. लघुउपग्रह निर्मितीच्या प्रकल्पात महापालिकेच्या शिक्षिका सौ. अश्‍विनी वांडरे, सौ. शैलजा कोरे यांसह अन्य शिक्षक सहभागी होते. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.