वारंवार घडणार्या अशा घटनांमुळे नुसती नायलॉन मांजा विक्रीवर बंदी न घालता मांजाची विक्री करणारे आणि ते वापरणारे यांवर महापालिका प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !

नागपूर – नायलॉन मांजाने गळा कापून प्रणय ठाकरे (वय २० वर्षे) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. गेल्या १० दिवसांत नायलॉन मांजाने घेतलेला प्रणय हा तिसरा बळी आहे. यापूर्वी २ मुलांनी नायलॉन मांजामुळे जीव गमावला आहे. प्रणय आपल्या दुचाकीवरून जात असतांना त्या वेळी वाटेत दोघे जण अडकलेला मांजा ओढत होते. या वेळी मांजाने प्रणय याचा गळा कापला गेल्याने तो खाली पडला. लोकांनी त्याला रुग्णालयात भरती करेपर्यंत पुष्कळ रक्तस्राव झाला होता. रुग्णालयात नेताच आधुनिक वैद्यांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना ताजी असतांनाच मानेवाड्यात सौरभ पाटणकर (वय २२ वर्षे) याचा मांजामुळे हात कापल्याची घटना घडली.
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार