मुंबई – अमली पदार्थ नियंत्रक विभागाने (एन्.सी.बी.) अमली पदार्थ विक्री आणि दलाली या प्रकरणी १३ जानेवारी या दिवशी समीर खान यांना अटक केली आहे. समीर खान हे राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचे जावई आहेत.
अमली पदार्थ तस्कर करण सजनानी यांना अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीत समीर खान यांचे नाव उघड झाले होते. करण सजनानी हे अमेरिका आणि लंडन येथून अमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी आहेत. समीर खान यांना चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे, असे अमली पदार्थ नियंत्रक विभागाचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले.