
मुंबई – लालबाग येथील सिलिंडरच्या स्फोटप्रकरणी मंगेश राणे आणि त्यांचा मुलगा यश यांच्या विरोधात काळाचौकी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे. या स्फोटात राणे पिता-पुत्र गंभीर घायाळ झाले असून उपचारांनंतर त्यांना अटक करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. लालबाग येथील साराभाई इमारतीत ६ डिसेंबर या दिवशी झालेल्या सिलिंडर स्फोटात दोन जणांचा मृत्यू, तर १४ जण घायाळ झाले होते. राणे यांचा खानपानाचा (कॅटरिंगचा) व्यवसाय आहे. गॅस गळती झाल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले होते; परंतु त्यावर उपाय करण्यापूर्वीच हा स्फोट झाला. या प्रकरणी कामगार, स्थानिक नागरिक, नातेवाईक यांचे जबाब नोंदवण्यात येत आहेत.
मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये, तर घायाळ झालेल्यांना ५० सहस्र रुपये आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)