धर्मांधासमवेत पळून गेलेल्या हिंदु युवतीचा कोरोनामुळे मृत्यू

येथील १९ वर्षीय हिंदु युवती रिक्शावाला हैदर महंमद मोटगी याच्यासमवेत ३० ऑक्टोबर या दिवशी पळून गेली होती. तिला कोरोना झाल्याने २ नोव्हेंबर या दिवशी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र तिचा उपचाराच्या वेळी मृत्यू झाला.

अवैध आणि चिनी फटाक्यांची विक्री थांबवणे, तसेच मिठाईतील भेसळ रोखणे यांसाठी मुंबई येथे धर्मप्रेमींचे पोलिसांना निवेदन

चीनचे फटाकेही बाजारात आहेत. त्यांच्यामुळे प्रदूषण होत असल्याने ते अधिक धोकादायक आहेत. अशा फटाक्यांवर बंदी घालावी, यासाठी मुंबईतील धारावी पोलीस ठाण्यात हिंदु जनजागृती समिती, वज्रदल आणि श्रीराम गणेश मंदिर मित्र मंडळ या संघटनांनी निवेदन दिले.

कोरोनाविषयीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने पुण्यातील सारसबाग अनिश्‍चित कालावधीसाठी बंद

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील उद्याने बंद करण्यात आली होती; मात्र सध्या कोरोनाचे प्रमाण न्यून होत असल्याने अनेक मासांपासून बंद असलेली उद्याने खुली करण्याविषयी नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती.

कर्नाटकात मराठा समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा !

कर्नाटकात मराठा समाज महामंडळासाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई महापालिका सभागृहात जागेअभावी अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यास प्रशासनाचा नकार

भारतरत्न आणि देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिला आहे.

वीज कर्मचार्‍यांनी घेतला संप मागे !

दळणवळण बंदी काळापासून अद्यापर्यंत वीज कर्मचारी प्राणांची पर्वा न करता काम करत आहेत. शासनाने इतर विभागातील कर्मचार्‍यांना दीपावलीनिमित्त सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर केले; मात्र वीज कर्मचार्‍यांना यापासून वंचित ठेवले.

सातारा येथे रात्री १२ वाजल्यानंतर पोलिसांकडून तपासणी

कोरोनामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चोर्‍यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

बनावट नोटांसह देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारी टोळी पोलिसांकडून जेरबंद !

कराड तालुक्यातील कोळेवाडी येथे ९४ सहस्र ५०० रुपयांच्या बनावट नोटा आणि देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. ठाणे गुन्हे शाखा आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखा यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली.

डी.एड्. अभ्यासक्रमातील ५० टक्के जागा मुसलमानांसाठी राखीव ठेवल्यावरून विहिंपची मेवात विकास प्राधिकरणाला नोटीस

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची नोटीस विहिंपला का द्यावी लागते ? सरकारनेच हे आरक्षण रहित करून हिंदूंना न्याय दिला पाहिजे.

नक्षलवादाचे पाठीराखे !

केंद्रातील सरकारने शाळा-महाविद्यालये यांमध्ये क्रमिक अभ्यासक्रम पालटण्याची, तसेच शिक्षणाच्या टप्प्यांच्या रचनेत पालटण्याचे प्रयत्न गतीमानतेने करावेतच. नक्षलवादाच्या समर्थकांना शोधून कठोर शिक्षा करण्याची चळवळच हाती घ्यावी, जेणेकरून असे प्रयत्न भविष्यात कुणी करण्यास धजावणार नाही.