कोरोनाविषयीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने पुण्यातील सारसबाग अनिश्‍चित कालावधीसाठी बंद

पुणे – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील उद्याने बंद करण्यात आली होती; मात्र सध्या कोरोनाचे प्रमाण न्यून होत असल्याने अनेक मासांपासून बंद असलेली उद्याने खुली करण्याविषयी नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती. या मागणीचा विचार करून १ नोव्हेंबरपासून शहरातील ८१ उद्याने खुली करण्यात आली; मात्र त्या वेळी दहा वर्षांखालील लहान मुले, ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असणारे नागरिक, गर्भवती महिला आणि अन्य आजार असणार्‍या व्यक्तींच्या प्रवेशावर निर्बंध घातले होते. उद्यानात येणार्‍यांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले होते; मात्र उद्याने खुली झाल्यानंतर या नियमांचे उल्लंघन होऊ लागले. शेवटी १४ नोव्हेंबरपासून सारसबाग अनिश्‍चित कालावधीसाठी बंद केली असल्याचे उद्यान विभागाकडून सांगितले आहे.