कुचराई नकोच… !

लस साठवण्यासाठी जागा आणि लसीच्या वितरणाची योग्य ती कार्यपद्धत राज्यांनी बारकाईने बसवणे, हे राज्यांचे दायित्व रहाणार आहे; त्यात चुका, गोंधळ, भ्रष्टाचार आदी गोष्टी झाल्या, तर आपल्यासारखे वाईट आपणच असणार आहोत. लस मिळूनही ती जनतेपर्यंत व्यवस्थित पोचली नाही, तर ‘देव देतो आणि कर्म नेते’ असे होईल !

‘ब्राह्मोस’ चाचणीच्या निमित्ताने…! 

भारतीय सैनिकांना मरणोत्तर सन्मान नको, तर विजयी होऊन त्यांनी जिवंतपणी सन्मान स्वीकारावेत, असे त्यांच्या घरच्यांनाच नव्हे, तर संपूर्ण देशाला वाटते. त्यामुळे जेव्हा जेव्हा नवनवीन शस्त्रास्त्रसज्जतेची वृत्ते येतात, तेव्हा ‘शक्तीमान असूनही किती दिवस दुबळ्याप्रमाणे जीवन कंठत रहायचे ?’, असा प्रश्‍न राष्ट्राभिमान्यांना वारंवार पडतो.

वीजदेयकांचा गोंधळ !

महावितरण शासकीय असल्याने ते खासगी आस्थापनाप्रमाणे ग्राहकांना लुबाडण्याची शक्यता अल्प आहे; परंतु येथे मानवी चुकांचे प्रमाण अधिक असल्याने ग्राहकांना मनस्ताप भोगावा लागत आहे. अशा चुका करणार्‍या कर्मचार्‍यांवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई झाली, तरच त्या चुका अल्प होऊ शकतात.

निवृत्तीवेतन धारकांची पायपीट !

निवृत्तीवेतन घेणार्‍यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यांच्या अडचणी प्राधान्याने सोडवणे अपेक्षित आहे. त्यामुळे शासनाने सर्व प्रकरणांची चौकशी करून निवृत्तीवेतन धारकांना न्याय द्यावा आणि कामचुकारपणा करणार्‍यांना कठोर शिक्षा द्यावी, ही अपेक्षा !

देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणाच्या कार्यात खारीचा वाटा उचला ! –  सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

भारताचे सैनिक ज्याप्रमाणे नि:स्वार्थ भावनेने देशासाठी लढतात. त्यांचा आदर्श घेऊन आपल्यालाही राष्ट्र आणि धर्म यांसाठी सिद्ध होऊन देव, देश अन् धर्म यांसाठी कार्यरत रहाता आले पाहिजे.

निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या भावामुळे पुनर्प्रसारणाच्या वेळीही लोकप्रिय ठरलेली ‘रामायण’ मालिका !

या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या अन् मालिकेशी जोडल्या गेलेल्या कलाकारांच्या मालिकेप्रती असलेल्या भावामुळे ही मालिका कोणत्याही काळात दाखवली, तरी लोकांना तेवढीच आवडेल !

अवघा आनंदची भरला परम पूज्यांनी माझ्या जीवनी ।

‘माझ्या साधनाप्रवासाचे चिंतन करतांना माझी व्यवहारात, सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म प्रसार करतांना, हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत सेवा करतांना आणि सध्याची स्थिती, यांविषयी मला गुरुकृपेने पुढील कविता सुचली.

अन्सारींचे नक्राश्रू !

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘इस्लाम संकटात’, असे उपरोधिक बोलून तेथील शिक्षकावर धर्मांध मुलाकडून झालेल्या आक्रमणाला ‘आतंकवादी आक्रमण’ संबोधले, तसेच आतंकवाद्यावर कारवाई करून देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची घोषणा केली. भारताच्या शासनकर्त्यांना हे केव्हा उमजणार आहे ? हा प्रश्‍न आहे !

हट्टी मुले !

उठल्याबरोबर लहान मुलांच्या हातात भ्रमणभाष असतो अथवा दूरचित्रवाणी चालू करून कार्टून पाहून दिवसाचा आरंभ केला जातो. यामध्ये किती घंटे वाया जातात ? आणि त्याचा आरोग्यावर काय दुष्परिणाम होतो ? हे मुलांना समजत नसले, तरी पालकांना समजत नसेल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

केला गुरुदेवांनी संकल्प हो हिंदु राष्ट्र-स्थापनेचा ।

संतांमध्ये श्रेष्ठ आहेत असे एक संत, अहो, नाव त्यांचे आहे श्री जयंत,
पाहूनी हो हिंदु धर्म अन् राष्ट्राची हानी, वाटली त्यांना बहु खंत,