केला गुरुदेवांनी संकल्प हो हिंदु राष्ट्र-स्थापनेचा ।

हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले
श्री. कृष्णकुमार जामदार

संतांमध्ये श्रेष्ठ आहेत असे एक संत,
अहो, नाव त्यांचे आहे श्री जयंत,
पाहूनी हो हिंदु धर्म अन् राष्ट्राची हानी,
वाटली त्यांना बहु खंत,
केला त्यांनी संकल्प हो हिंदु राष्ट्र-स्थापनेचा,
करूनी दुष्वृत्तीचा अंत…(जी-जी-जी…)

कार्यारंभी उपदेशिली नामसाधना
अन् कथिली महती अध्यात्माची,
दिधले सत्संगातूनी ज्ञान देव-धर्माचे,
ठसविले ध्येय आध्यात्मिक उन्नतीचे,
परिणामी, झाले साधक गण सिद्ध,
करण्या हे महान कार्य,
करूनी सर्वस्वाचा त्याग (जी-जी-जी….)

केले त्यांनी हिंदु समाजाला धर्माचरणी,
देऊनी धर्मशिक्षण वर्गातूनी,
वाढवूनी प्रीतीभाव आणि संघटितता हिंदूंमध्ये,
करवूनी घेतला त्यांच्याकरवी, ऐक्याचा हुंकार
आणि जातपातीचे भेद सारूनी मागे, झाले सर्व एक,
घालण्या ईश्‍वरापुढे साकडे हिंदु राष्ट्र-स्थापनेचे (जी-जी-जी…)

स्वभावदोष-अहं निर्मूलन करवूनी,
जुळवली मने साधकांची आणि हिंदूंची,
घडविला हो एकजुटीचा आविष्कार,
घेऊनी स्वरक्षण प्रशिक्षण
अन् जागृत करूनी क्षात्रभाव आपल्यात,
झाले ते कार्यान्वित, जणू ते गुरुमाऊलींचे मावळे,
निघाले या महान कार्यपूर्तीसाठी,
परि घेऊनी आशीर्वाद गुरुमाऊलींचे… (जी-जी-जी…)

‘गुरुमाऊलींच्या कृपेनेच या पोवाड्यातील शब्द स्फुरले अन् ते लिहून झाले’, यासाठी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. कृष्णकुमार जामदार (वय ६८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.५.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक