हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
रत्नागिरी जिल्ह्यात ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती वर्गाचा समारोप
रत्नागिरी – भारताचे सैनिक ज्याप्रमाणे नि:स्वार्थ भावनेने देशासाठी लढतात. त्यांचा आदर्श घेऊन आपल्यालाही राष्ट्र आणि धर्म यांसाठी सिद्ध होऊन देव, देश अन् धर्म यांसाठी कार्यरत रहाता आले पाहिजे. मराठमोळे मावळे आणि प्रभु श्रीरामांची वानरसेना यांप्रमाणे आपल्याला धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभागी होण्याचे दुर्मिळ सौभाग्य लाभत आहे. त्यामुळे प्रत्येकाने समितीच्या धर्मकार्यात सहभागी होऊन स्वत:चा खारीचा वाटा उचलूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी धर्मप्रेमींना केले. जिल्ह्यात ऑनलाईन शौर्यजागृती वर्गाच्या समारोपीय व्याख्यानात ते बोलत होते. हे व्याख्यान २० नोव्हेंबर या दिवशी घेण्यात आले.
श्री. सुमित सागवेकर पुढे म्हणाले,
१. प्रत्येक दिवसाला आपल्या देशात ८७ बलात्कार होतात. हिंदु नाव सांगून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करण्यासह त्यांना धर्मांतरित केले जाते. अशी ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असतांना काही राज्यांमध्ये यासंबंधी केवळ ‘कायदा करण्यात येईल’, असे म्हटल्यानंतर काही समाजकंटक ‘आता आम्ही धर्म बघून प्रेम करायचे का ?’, अशी गरळओक करतात आणि तरीही आम्ही निद्रिस्तच रहातो.
२. आम्ही भ्रमणभाषसारख्या गोष्टींच्या आहारी गेल्याने संस्कार आणि संस्कृती यांपासून दूर गेलो आहोत.
३. आज आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या विरांचा इतिहास शिकवला जात नाही. याच्या परिणामस्वरूप आज आमच्यातील शौर्य नष्ट झाले आहे. आता आमच्या विस्मृतीत गेलेला हा शौर्याचा इतिहास या वर्गाच्या माध्यमातून आत्मसात करत तो जागृत करण्याची वेळ आली आहे.
४. स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि धर्मावर होणारे आघात जर थांबवायचे असतील, तर छत्रपती शिवाजी महाराजांची नीती अवलंबावी लागेल.
अभिप्राय
प्राची पांचाळ : घरबसल्या प्रशिक्षण शिकायला मिळाले. आता आम्ही मैत्रिणींनासुद्धा याविषयी सांगू आणि आमच्यावर असा एखादा प्रसंग आला, तर नक्कीच त्याचा प्रतिकार करू शकू. आपल्याला जन्म देणार्या स्त्रीची होणारी विटंबना लांच्छनास्पद आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी या वर्गाची आवश्यकता आहे. आम्ही समाजापर्यंत शौर्यजागृतीची माहिती पोचवून त्यांना जागृत करू.
– श्री. सुमित सागवेकर