अवघा आनंदची भरला परम पूज्यांनी माझ्या जीवनी ।

साधकांचे जीवन आनंदी करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘माझ्या साधनाप्रवासाचे चिंतन करतांना माझी व्यवहारात, सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म प्रसार करतांना, हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत सेवा करतांना आणि सध्याची स्थिती, यांविषयी मला गुरुकृपेने पुढील कविता सुचली.

पू. शिवाजी वटकर

बैल होऊनी मी जुंपलो होतो मायेतील घाण्याला ।
बेजार झालो होतो सुख-दु:खाच्या फटकार्‍याला ॥ १ ॥

झालो होतो मी सनातनचा अध्यात्म प्रचारक ।
कर्तेपणाच्या बुद्धीने मला छेडिले होते रात्रं-दिन ॥ २ ॥

राबवत होतो मी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोहिमा ।
यशाने मला चढला होता स्वकौतुकाचा अहं ॥ ३ ॥

शरणागत झालो मी परम पूूज्यांच्या चरणी (टीप) ।
कृतज्ञताभावाने लीन होतो श्री गुरुचरणी ॥ ४ ॥

स्वभावदोष उणावले, अहं पळाला, भोग सरला, शीण गेला ।
अवघा आनंदची भरला परम पूज्यांनी माझ्या जीवनी ॥ ५ ॥

टीप : सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले

– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.९.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक