ब्राह्मणद्वेषाची काविळ झालेल्यांसाठी प्रश्न !

‘बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे माजी आमदार यदुवंश कुमार यादव यांनी ‘ब्राह्मण हे भारतीय नसून परदेशांतून आले आहेत’, असे विधान केल्याची चित्रफित बिहारच्या निवडणुका जवळ येताच पुन्हा प्रसारित झाली आहे. पावसाळा आला की, उगवणार्‍या कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे ब्राह्मणांच्या विरोधातील वक्तव्ये निवडणुका जवळ आल्या की केली जातात. ब्राह्मणांच्या विरोधात वक्तव्य करणे, हे गेल्या ७७ वर्षांतील लोकप्रियता मिळवण्याचे विनाखर्चिक साधन आहे. अशा लोकांची वक्तव्ये प्रसारित झाल्यावर जनतेने त्यांना पुढील प्रश्न विचारायला हवेत, असे वाटते.

श्री. धैवत वाघमारे

१. ज्या अकबर, औरंगजेब इत्यादी मोगलांचा उदोउदो गेली ७७ वर्षे सामजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रांत करण्यात येत आहे, ते भारतीय आहेत का ? त्यांच्या पिलावळीची थुंकी तुम्ही का झेलता ?

२. गेल्या जवळजवळ अडीच सहस्र वर्षांत परकीय आक्रमकांनी, उदा. शक, हूण, इत्यादींनी भारतावर आक्रमणे केली. त्यांचा पराभव झाल्यानंतर ते देश सोडून न जाता भारतातच वास्तव्य करून राहिले. त्यांना तुम्ही शोधून काढून ‘देशाबाहेर जा’, असे सांगणार का ? ते कोण आहेत, हे तरी तुम्हाला ठाऊक आहे का ?

३. लाखो बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोर आज भारतभरात आहेत. त्यांना तुम्ही कधी ‘परकीय’ म्हटल्याचे ऐकिवात येत नाही. त्यांना ‘तुम्ही बाहेरचे आहात’, असे कधी म्हणणार ? त्यांना देशाबाहेरचा रस्ता कधी दाखवणार ?

४. इस्लाम आणि ख्रिस्ती हे धर्मच भारतात परकीय देशांतून आलेले आहेत. ‘त्यांना तुम्ही कधी देश सोडून जा’, असे का सांगत नाही ?

५. ब्राह्मण हे कधी शस्त्र उचलत नाहीत, आक्रमक होत नाहीत, कायद्याचे पालन करतात; म्हणून तुम्ही त्यांच्याविषयी वाटेल ती वक्तव्ये करता का ?

६. देशाच्या प्रगतीत ब्राह्मण योगदान देत नाहीत का ? देशासाठी ब्राह्मण बलीदान देत नाहीत का ?

७. स्वार्थांध राजकारण्यांनी ब्राह्मणद्वेष करून आजपर्यंत कोणत्या जातीचे भले केले आहे ?

८. आज भारतातील कोणता समाज आहे, जो जातीपातीच्या राजकारणामुळे निकोप आणि समृद्ध झाला आहे ? तुम्ही स्वार्थांध राजकारण्यांनी कधी कुणा जातीचे भले केले आहे का ?

९. केवळ जातीजातींत फूट पाडून तुम्ही राज्य मिळवू इच्छित आहात. देशभरात सर्वत्र असेच चालू राहिले, तर ब्राह्मणांचे सोडून द्या, ‘इतर जाती एकमेकांच्या विरोधात हातात शस्त्र घेतील आणि नंतर काय होईल ?’, याची कल्पनाच न केलेली बरी ! या स्थितीत जे अराजक निर्माण होईल, त्यातून देशाची सहस्रो शकले होतील, हे तुमच्या लक्षात येत नाही का ?

जातीजातींतील फूट रोखण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापना हाच पर्याय !

केवळ मेकॉलेप्रणीत शिक्षणप्रणालीतून भारतियांमध्ये भिनवण्यात आलेल्या ब्राह्मणद्वेषापोटी हे राजकारणी सत्य बघू आणि जनतेसमोर येऊही देऊ इच्छित नाहीत. तसे झाल्यास यांची दुकाने बंद पडणार आहेत. ‘त्यांना मंत्रीपदाच्या खुर्च्या मिळणार नाहीत’, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. हिंदूंनो, कोणतीही निवडणूक असो, कोणताही राष्ट्रीय, धार्मिक, सामाजिक उत्सव असो, एक भाग लक्षात ठेवा, ‘एक आहात, तर सुरक्षित आहात’ आणि ‘विखुरलात, तर नष्ट व्हाल’, या घोषवाक्यांची पावलोपावली आवश्यकता आहे. हिंदूंनो,  रात्र नव्हे, दिवसही वैर्‍याचा आहे ! ‘एकीकडे देशात सामाजिक सद्भावनेच्या गोष्टी करायच्या आणि स्वार्थ साधण्याची वेळ आली की, जातीजातींत फूट पाडायची’, ही राजकारण्यांची (कु)नीती आहे. या राजकारण्यांची कोल्हेकुई थांबवण्यासाठी आता हिंदूंनी एक होऊन ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करण्याविना पर्याय नाही !’ (१७.३.२०२५)

– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

‘देशात सामाजिक सद्भावनेच्या गोष्टी करायच्या आणि वेळप्रसंगी स्वार्थासाठी जातीजातींत फूट पाडायची’, ही राजकारण्यांची (कु)नीती !