अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील ‘मंगळग्रह सेवा संस्थे’कडून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रांताधिकार्‍यांना १ लाख रुपयांचा धनादेश !

प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना धनादेश देतांना संस्थेचे उपाध्यक्ष एस्.एन्. पाटील

जळगाव, ७ एप्रिल (वार्ता.) – जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था ही केवळ एक धार्मिक संस्था नसून सामाजिक जाणिवेचे भान ठेवणारी संस्था आहे. आताही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाच्या आवाहनानंतर संस्थेने एक लाख रुपयांचा धनादेश प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना दिला. हाच धनादेश वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांना सुपुर्द करण्यात आला. या धनादेशाद्वारे लोकसहभागातून प्रशासनाने उभारलेल्या कोविड केंद्रामध्ये रुग्णांसाठी ऑक्सिजनची सोय करण्यात येणार आहे. या वेेेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस्.एन्. पाटील, सचिव एस्.बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्‍वस्त अनिल अहिरराव आदी उपस्थित होते.