इंग्लंडमध्ये भारतीय संगीताच्या अभ्यासासाठी ‘मुन्नी बदनाम हुई’ या गाण्याचा समावेश !

साधना केल्यासच खर्‍या अर्थानेच संगीताचा अभ्यास करता येईल ! असे असतांना संगीताच्या अभ्यासाच्या नावाखाली ‘मुन्नी बदनाम हुई’ सारख्या अश्‍लील गाण्यांची निवड करणे म्हणजे मूळ भारतीय संगीताला ‘बदनाम’ करण्याचा प्रकार आहे !

मुख्यमंत्र्यांनी अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली ! – चंद्रकांत पाटील, भाजप

रिक्शाचालक प्रत्येक मासात १० सहस्र रुपये कमवतात आणि त्यांना केवळ दीड सहस्र रुपये देऊन त्यांच्याही तोंडाला पाने पुसली आहेत. केवळ निर्बंध लादायचे आणि फारसे साहाय्यही करायचे नाही, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.’’

देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीकारक यांचा आदर्श समोर ठेवून ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याची वेळ आता आली आहे.

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) परिसरामध्ये पसरत चाललेल्या साथीच्या आजारावर तातडीने उपाययोजना करा ! – करवीर शिवसेनेचे प्राथमिक आरोग्य केंद्रात निवेदन

उंचगावमध्ये मलेरिया सदृश्य रुग्ण आणि तापाचे रुग्ण यांमध्ये वाढ होत असून याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.

पुण्यात सराईत गुन्हेगार आणि निवृत्त पोलीस कर्मचार्‍यामधील झटापटीत गुन्हेगाराचा मृत्यू !

अनंत ओव्हाळ हे बोपोडीतील आनंदनगर परिसरात काही कामानिमित्त गेले होते. या वेळी गुन्हेगार मनिष भोसलेने त्यांची दुचाकी अडवत त्यांच्यासोबत वाद घातला. यानंतर दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. या झटापटीत मनिषचा मृत्यू झाला.

(म्हणे) ‘जानवे धारण करणारे सर्व शूद्रच !’ – के.एस्. भगवान

हिंदूंच्या धर्मशास्त्राचा साधनेच्या स्तरावर अभ्यास न करता बुद्धीने त्याचा किस पाडून अशा प्रकारची विधाने करण्यास बुद्धीप्रामाण्यावादी आणि तथाकथित पुरो(अधो)गामी आघाडीवर आहेत. त्यापैकीच भगवान हे एक आहेत.

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरामुळे रुग्णाचा मृत्यू टाळता येईल, असा कोणताही आधार आढळून आलेला नाही ! – डॉ. राहुल पंडित, सदस्य, राज्य कृती दल

रेमडेसिवीरमुळे मृत्यूचे प्रमाण न्यून होत नसल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचाही निष्कर्ष

गरिबांना अर्थसाहाय्य करण्यासाठी कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी

पॉस्को न्यायालयाने आरोपीला बलात्कारी ठरवल्याचा निकाल पाटणा उच्च न्यायालयाकडून रहित

पाटणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल पालटत ‘न्यायाधिशांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे’ असे म्हटले आहे. ‘पॉस्को’ न्यायालयाने बलात्काराचा प्रयत्न करणार्‍याला १० वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली होती.

कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी लागणार्‍या रेमडेसिविर इंजेक्शनचा पुण्यात तुटवडा आहे. त्याच्या निषेधार्थ १५ एप्रिल या दिवशी सकाळपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांनी ठिय्या आंदोलन केले.