रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याचा निषेध
पुणे – कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी लागणार्या रेमडेसिविर इंजेक्शनचा पुण्यात तुटवडा आहे. त्याच्या निषेधार्थ १५ एप्रिल या दिवशी सकाळपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांनी ठिय्या आंदोलन केले. इंजेक्शनअभावी नातेवाइकांना अनेक ठिकाणी फिरावे लागत आहे. प्रशासनाने ‘प्रत्येक रुग्णालयात हे इंजेक्शन उपलब्ध करण्यात येईल’, असे सांगितले होते; पण आता या इंजेक्शनचा साठाच संपलेला आहे. ‘जोपर्यंत इंजेक्शन मिळत नाही, तोवर जागेवरून उठणार नाही’, अशी भूमिका रुग्णांच्या नातेवाइकांनी घेतली आहे. याआधी रुग्णांचे नातेवाईक बंडगार्डन चौकात एकत्र जमले होते. हतबलतेमुळे अनेकांना रडू येते होते.