Champions Trophy Terror Alert : ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’च्या वेळी पाकिस्तानमध्ये विदेशी नागरिकांच्या अपहरणाची शक्यता ! – गुप्तचर संस्था
पाकिस्तान हा आतंकवाद्यांचा अड्डा आहे, हे भारताने अनेक वेळा आंतरराष्ट्रीय व्यासपिठावरून स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट चाहते यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास पाकिस्तानमध्ये स्पर्धा आयोजित करणार्या ‘आयसीसी’ला उत्तरदायी धरले पाहिजे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही !