फाळणीच्या ७२ वर्षांनंतर प्रथमच पाकमधील प्राचीन गुरुद्वारा उघडला !

पाकच्या पंजाब प्रांतातील झेलम जिल्ह्यात रोहतास किल्ल्याजवळ असणारा ऐतिहासिक गुरुद्वारा ‘चोआ साहिब’ फाळणीच्या ७२ वर्षांनंतर सर्व शिखांसाठी उघडण्यात आला आहे.

कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाचे साहाय्य देण्यास पाकची अनुमती

पाकच्या कारागृहात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाचे साहाय्य (कॉन्स्युलर एक्सेस) देण्यासाठी पाकने संमती दिली आहे.

पाकमधील १ सहस्र वर्षे जुने बंद असलेले मंदिर ७२ वर्षांनंतर हिंदूंसाठी उघडले !

पाकच्या सियालकोट शहरामधील एक सहस्र वर्षे जुने असलेले हिंदूंचे शावला तेज सिंह मंदिर हिंदूंसाठी उघडण्यात आले. फाळणीपासून हे मंदिर हिंदूंसाठी बंद करण्यात आले होते.

(म्हणे) ‘कोणाचेही बलपूर्वक धर्मांतर इस्लामविरोधी !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

जगाचा इतिहास क्रूर इस्लामी आक्रमकांकडून धर्माच्या आधारे केलेल्या अत्याचारांनी बरबटलेला असतांना, तसेच भारतात गल्ली-बोळात लव्ह जिहादसारखे प्रकार प्रतिदिन घडत असतांना खान यांचे हे विधान म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हाज को’, या स्वरूपाचे आहे !

ओसामा बिन लादेनची माहिती पाककडे नव्हतीच !

पाकचे राज्यकर्ते खोटारडे आहेत, हे त्याचेच सैन्याधिकारी आता सांगत आहेत. यातच सर्व आले !

पाकमधील ५० टक्के जनतेला मिळते केवळ एक वेळचे जेवण

कर्जामध्ये आकंठ बुडत चालेल्या पाकमध्ये प्रतिदिन केवळ ५० टक्के कुटुंबांना एक वेळचे जेवण मिळत आहे. त्यामुळे ४०.२ टक्के लहान मुलेही कुपोषित असून त्यांची वाढ खुंटली आहे, अशी माहिती पाकच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाने प्रथमच केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली.

भारताने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप करत पाककडून भारताच्या उपउच्चायुक्तांना समन्स

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! गेली १५ वर्षे प्रतिदिन पाककडूनच शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे आणि यात अनेक भारतीय सैनिक हुतात्मा झाले, तर अनेक जण घायाळ झाले आहेत, तरीही पाक भारतावर आरोप करत आहे, यातून त्याची हुशारी लक्षात येते !

पाकमधील मुलींचे अपहरण आणि धर्मांतर रोखण्यासाठी इम्रान खान यांच्याशी चर्चा करावी ! – अमेरिकेच्या १० खासदारांचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र

सध्या पाकचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेतील १० खासदारांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहिले आहे.

पाकच्या सिंध प्रांतातील विधानसभेत हिंदु मुलींचे अपहरण आणि धर्मांतर रोखण्यासाठी खासगी विधेयक एकमताने संमत

पाकच्या सिंध प्रांताच्या विधानसभेमध्ये सदस्यांनी हिंदु मुलींचे होणारे अपहरण आणि धर्मांतर यांविषयीचे सूत्र उपस्थित केले. या सूत्रावर सर्व पक्षांच्या सदस्यांनी चिंता व्यक्त करून ते रोखण्याची एकमुख मागणी केली.

आतंकवादी हाफीज सईद याला पाकिस्तानात अटक

पाकने हाफीजला केलेली अटक ही धूळफेकच आहे, हे शेंबडे पोरही सांगेल ! पाकला खरोखर आतंकवाद्यांवर कारवाई करायची असती, तर हाफीजला केव्हाच अटक करून फासावर लटकवले असते !


Multi Language |Offline reading | PDF