Pakistan Dawood University : कराची (पाकिस्तान) येथील विद्यापिठात होळी खेळल्याने हिंदू आणि मुसलमान विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंद

विद्यापिठाने कारणे दाखवा नोटीस बजावली आणि प्रवेशावर घातली बंदी

कराची (पाकिस्तान) – येथील दाऊद अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापिठात होळी खेळल्याबद्दल हिंदू आणि मुसलमान विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २१ फेब्रुवारी या दिवशी दोन्ही धर्मांतील काही विद्यार्थ्यांनी विद्यापिठाच्या परिसरामध्ये होळीचा सण साजरा केला. यानंतर विद्यापीठ प्रशासनाने या विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आणि परिसरामध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली. या विद्यार्थ्यांना २४ फेब्रुवारी या दिवशी त्यांच्या पालकांसह विद्यापिठात येण्यास सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना विद्यापिठातून काढून टाकण्याची चेतावणी देण्यात आली आहे.

यापूर्वी मार्च २०२३ मध्ये लाहोरमधील पंजाब विद्यापिठात होळी खेळणार्‍या हिंदू विद्यार्थ्यांवर आक्रमण झाले होते. होळी खेळण्यासाठी पीयू लॉ कॉलेजमध्ये सुमारे ३० विद्यार्थी जमले होते. यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाची अनुमतीही घेतली होती. त्यानंतर कट्टरपंथी इस्लामी विद्यार्थी संघटना इस्लामी जमियत तुलाबाच्या लोकांनी हिंदु विद्यार्थ्यांवर आक्रमण केले होते. या घटनेनंतर विद्यापिठाचे प्रवक्ते खुर्रम शहजाद म्हणाले होते की, प्रशासनाने विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या परिसरात होळी साजरी करण्याची अनुमती दिली नव्हती. त्यांना आत होळी खेळण्यास सांगण्यात आले.

संपादकीय भूमिका 

भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली आणि तेथे रहाणार्‍या हिंदूंची स्थिती दयनीय झाली, तर भारतात रहाणारे धर्मांध मुसलमान हिंदूंच्या डोईजड झाले, हे लक्षात घ्या !