Terrorist Kashif Ali Killed : पाकमध्ये अज्ञाताकडून हाफिज सईद याच्या आतंकवादी मेहुण्याची हत्या

आतंकवादी मौलाना काशिफ अली व हाफिज सईद

इस्लामाबाद (पाकिस्तान) – बरेच दिवसानंतर पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा अज्ञाताकडून आतंकवाद्यांची हत्या करण्यात आली आहे. ठार झालेल्या आतंकवाद्याचे नाव मौलाना काशिफ अली असून तो लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर होता. इतकेच नाही, तर या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याचा मेहुणा (पत्नीचा भाऊ) होता. काशीफ या संघनेच्या ‘पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग’ या राजकीय विभागाचाही सदस्य होता. पाकिस्तानमधील खैबर पख्तूनवा प्रांतातील स्वाबी जिल्ह्यात अज्ञात दुचाकीस्वाराने मौलाना काशिफ अली याच्यावर गोळीबार करत त्याला ठार केले.

१. आतंकतवादी काशिफ अली मुसलमान तरुणांना आतंकवादी संघटनेमध्ये भरती करायचा. काशिफ अली हा अनेक मशिदी आणि मदरसे यांचा प्रमुखही होता. तो आतंकवादाचे धडे देऊन मदशात शिकणार्‍या तरुणांना आतंकवादी संघटनेमध्ये भरती करायचा. त्याखेरीज तो आतंकवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये जिहादी धडे देत होता.

२. काशिफ अली याच्या हत्येनंतर आतंकवादी संघटनांशी निगडित असलेल्या अनेक संघटनांनी पाकिस्तान सरकारवर टीका केली आहे. हत्या करणार्‍या आरोपीला तातडीने पकडण्याची मागणी केली आहे. ‘काशिफ अली याचा दोष एवढाच होता की, तो पाकिस्तानवर प्रेम करत होता’, अशा प्रकराची एक पोस्टही त्याच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.