निधन वार्ता

लांडेवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील सनातनच्या साधिका सौ. शशिकला शामराव टेमकर यांचे वडील कै. गुलाबराव भिकाजी शेवाळे (वय ९३ वर्षे) यांचे  ७ जानेवारी या दिवशी सकाळी ११.३० वाजता निधन झाले.

शैलेंद्र वेलिंगकर यांच्यावरील अत्याचार, हा भाजपचा माझ्या विरोधातील सूडचक्राचा भाग ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

या मारहाणीत शैलेंद्रचा ‘इअरड्रम’ फाटला असून डाव्या कानाने ऐकू येणे बंद झाले आहे. त्याला हेतूपुरस्सर सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात न तपासता, म्हापशाच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऊसतोडणी कामगारांची उणीव असल्याने शेतकर्‍यांचा स्वतःच ऊसतोडणी करण्याचा निर्णय

असळज (तालुका गगनबावडा) येथे डॉ. डी. वाय. पाटील ऊस कारखाना निर्मितीनंतर जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी या दोन तालुक्यांमध्ये उसाचे क्षेत्र वाढले. सद्यःस्थितीत जिल्ह्यात सरासरी १ लाख टन उसाचे उत्पादन होते. यंदा कोरोनामुळे बीड, परभणी यांसह विविध भागांतून ऊसतोडणीसाठी येणारे कामगार अल्प आले आहेत.

पावसामुळे पुण्याच्या प्रदूषणात घट !

३ शहरांच्या तुलनेत पुणे शहराची हवेची गुणवत्ता चांगली असल्याचे निरीक्षण

मुरुंबा (जिल्हा परभणी) येथे ८०० हून अधिक कोंबड्या मृत्युमुखी !

‘बर्ड फ्लू’च्या आजाराचे संकट घोंगावत असतांनाच घडलेली ही घटना चिंताजनक आहे ! 

मुंबई शहरातील शेकडो रुग्णालयांकडे अग्नीसुरक्षेचे प्रमाणपत्र नाही !

अग्नीसुरक्षेचे प्रमाणपत्र न घेणार्‍या रुग्णालयांवर प्रशासन का कारवाई करत नाही ?

नगर येथील केंद्रीय संस्था राज्याबाहेर जाण्याची शक्यता

VRDE संस्था स्थलांतरित केल्यास स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे.

भिवंडी येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोरंट वीज वितरण आस्थापनाची कार्यालये फोडली

आस्थापनाच्या मनमानी कारभाराचा निषेध करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

गंगावेस ते शिवाजी पूल रस्ता येथे उड्डाणपूल करावा !

गंगावेस ते शिवाजी पूल या ठिकाणी वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होते ,त्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठे आहे.

गुन्ह्याची माहिती लपवल्याने काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचे पारपत्र कह्यात

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री, तसेच काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी स्वतः केलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवल्याने त्यांचे पारपत्र नागपूर पारपत्र विभागाने कह्यात घेतले आहे.