गंगावेस ते शिवाजी पूल रस्ता येथे उड्डाणपूल करावा !

आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतांना किशोर घाटगे (उजवीकडून दुसरे)

कोल्हापूर, ९ जानेवारी (वार्ता.) – गंगावेस ते शिवाजी पूल या ठिकाणी वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण मोठे आहे. गंगावेस ते शिवाजी पूल रस्ता येथे उड्डाणपूल करावा, अशी मागणी आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने नगरविकासमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी श्री. एकनाथ शिंदे यांनी आखरी रास्ताच्या कामातील सर्व तांत्रिक त्रुटी दूर करून रस्ता त्वरित करण्याचे आणि उड्डाणपुलाचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश महापालिका प्रशासनास दिले.
या वेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्री. किशोर घाटगे, सर्वश्री राकेश पाटील, सुरेश कदम, राकेश पोवार, सुशील भांदिगीरे, रोहन अतिग्रे, अनंत पाटील यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.