केंद्र सरकारचा प्रस्ताव शेतकर्‍यांनी फेटाळला

१४ डिसेंबरला एकदिवसीय उपोषण आणि देशभरात धरणे आंदोलन करणार

‘पी.एफ्.आय.’वर बंदीसाठी गोव्यात ‘श्री परशुराम गोमंतक सेने’चे १६ डिसेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन

या संघटनेवर गोव्यात बंद घालण्याची मागणी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे ३ मासांपूर्वी केली होती; मात्र या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ‘पी.एफ्.आय.’च्या विरोधात आताच कारवाई न झाल्यास गोव्याचा पश्‍चिम बंगाल किंवा बिहार व्हायला वेळ लागणार नाही-श्री. शैलेंद्र वेलींगकर

‘ए.के. व्हर्सेस ए.के.’ या चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मधील आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची भारतीय हवाई दलाची मागणी

आक्षेपार्ह दृश्ये प्रसारित करून चित्रपटाला प्रसिद्धी मिळवून द्यायची, असा नवा फंडा निर्माण झाला आहे. सातत्याने होणारे हे प्रकार लक्षात घेऊन असे प्रकार रोखण्यासाठी शासनाने ठोस धोरण निश्‍चित करणे आवश्यक आहे.

लैंगिक अत्याचारप्रकरणी २ आरोपींना न्यायालयाकडून २० वर्षांची शिक्षा

४ वर्षांची मुलगी लैंगिक अत्याचाराविषयी खोटे बोलू शकत नाही, असे नमूद करत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायालयाने २ आरोपींना दोषी ठरवून त्यांना प्रत्येकी २० वर्षांची शिक्षा सुनावली.

पैठण येथील संत ज्ञानेश्‍वर उद्यानाचा होणार कायापालट

संभाजीनगर जवळील पैठण येथील संत ज्ञानेश्‍वर उद्यानाचा संपूर्ण कायापालट करून देश-विदेशातील पर्यटकांना तेथे आकर्षित करण्यासाठी नागरिकांकडून नाविन्यपूर्ण कल्पना मागवा, तसेच जागतिक स्तरावरील सल्लागारही नियुक्त करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

(म्हणे) ‘कोणत्याही परिस्थितीत शिर्डीला जाणारच !’

चित्रपट, वेब सीरिज आदींतून पसरवल्या जाणार्‍या अश्‍लीलतेला विरोध न करता सभ्यतेला विरोध करणार्‍या तृप्ती देसाई यांची विकृती !

इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंतच्या शाळा चालू करण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय नाही ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भविष्यकालीन उपाययोजना, सुरक्षा आणि आरोग्य विषयक सूत्रे यांचा विचार करून, तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य अन् शैक्षणिक हित लक्षात घेऊन सरकार योग्य तो निर्णय घेईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवली न जाणे ही ठाकरे सरकारची नाचक्की ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

सरकारची पूर्वसिद्धता नसल्याने मराठा आरक्षणाची स्थगिती कायम राहिली. ही ठाकरे सरकारची नाचक्कीच आहे. आज न्यायालयात पुन: पुन्हा तीच तीच सूत्रे मांडली गेली. न्यायालयापुढे सरकारी अधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी कोणतीही नवीन सूत्रे मांडले नाहीत….

ब्राह्मण महासंघ महिला आघाडीच्या ५० महिला शिर्डी संस्थानने लावलेल्या फलकाचे रक्षण करणार !

शिर्डी संस्थान यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्व साई भक्तांनी स्वागत केले आहे, असे असतांनाही काही विकृती त्यांचा विरोध करत आहेत. शिर्डी येथे जाऊन फलक काढण्याची भाषा करत आहेत. शिर्डी संस्थानच्या समर्थनार्थ तसेच तेथे लावलेल्या फलकाचे रक्षण करण्यासाठी ब्राह्मण महासंघ महिला आघाडीच्या ५० महिला त्या ठिकाणी सकाळी १० वाजल्यापासून थांबतील….

नंदुरबार शहरातील उघड्यावरील मांस विक्री कायमस्वरूपी बंद करण्याची हिंदु सेवा साहाय्य समितीची मागणी

का पिसाळलेल्या कुत्र्याने वीर सावरकर नगर येथील पाच वर्षीय कु. हिताक्षी मुकेश माळी हिचा चावा घेतल्याने तिचा उपचाराच्या वेळी मृत्यू झाला. कामात कुचराई करणार्‍या संबंधित स्वच्छता ठेकेदाराचा ठेका रहित करावा, मांस विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून उघड्यावरील मांस विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी…