खाद्यपदार्थांचे प्लास्टिक पॅकेट रिसायकल करण्यास अनुमती द्या !

ग्राहकाने प्लास्टिक बाटली कचर्‍यात फेकण्याऐवजी दुकानदाराला परत दिल्यास पैसे देण्याची योजना एफ्.एस्.एस्.ए.आय.कडून बनवली जात आहे.

सातारा जिल्ह्यात खासगी शाळा शैक्षणिक शुल्क अल्प करणार !

खासगी शाळा संघाने बोलावलेल्या बैठकीत शाळा शुल्काविषयी सकारात्मक चर्चा होऊन शुल्क अल्प करण्याचा निर्णय झाल्याने ‘जिल्हा पालक संघा’च्या संघटित लढ्याला मोठे यश प्राप्त झाले आहे, अशी माहिती संघाचे प्रशांत मोदी यांनी दिली.

सांगलीत कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई

३० मार्च या दिवशी २ उपाहारगृहे आणि १ बेकरी यांच्याकडून नियमांचे उल्लंघन झाल्याच्या प्रकरणी ७५ सहस्र रुपयांचा दंड आकारण्यात आला.

पुणे येथील ग्राहकांनी वीजमीटर खुल्या बाजारातून खरेदी करू नयेत ! – महावितरणचे आवाहन

महावितरणकडून प्रतिवर्षी अनुमाने ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या करण्यात येतात. मागील वर्षीची दळणवळण बंदी आणि कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वीजमीटरची उपलब्धता अल्प झाली होती.

लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा, डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा अन्यथा मागील वर्षीसारखी स्थिती पुन्हा अनुभवावी लागेल !

४५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांनी कोरोनाची लस घ्यावी. राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत आता वाढ होत आहे. कोरोनाचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यास हळूहळू कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या उणावू लागेल.

ठाणे येथे कोट्यवधी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटणारी धर्मांधांची टोळी अटकेत

शिवाईनगर भागातील वारीमाता गोल्ड या सोन्या-चांदीच्या दुकानातून १ कोटी ३७ लाख २ सहस्र रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटणारे सुलतान शेख, अब्दुल हक आणि आलमगिर शेख या तिघांना कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.

सातत्याने तक्रार करूनही अवैध पशूवधगृहांवर कारवाई न करणार्‍या वसई-विरार शहर महापालिका प्रशासनाच्या विरोधात गोरक्षकांचे आमरण उपोषण

उघडपणे चालणार्‍या अवैध पशूहत्येच्या विरोधात कारवाई न करणारे वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासन जनतेच्या हितासाठी काम करते कि कसायांसाठी ?

श्री मलंगगडावर आरतीसाठी निघालेले मनसेचे नेते अविनाश जाधव पोलिसांकडून कह्यात !

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस हिंदूंना कह्यात घेतात आणि धर्मांधांना मात्र कोणतेही कृत्य करण्याची मोकळीक देतात, हा दुटप्पीपणाच होय !

नियम पाळा आणि दळणवळण बंदी टाळा ! – आरोग्यमंत्री राजेश टोपे

लसीकरण वेगाने चालू असून ‘हर्ड इम्युनिटी’ आणण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यातून रुग्णसंख्या न्यून होतांना दिसेल.

नाशिकमध्ये बाजारात खरेदीसाठी प्रतिघंटा आकारले जाणार ५ रुपये शुल्क !

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने एक आदेश काढला आहे. बाजारात खरेदीला जाण्यासाठी प्रतिघंटा ५ रुपये शुल्क महापालिकेकडून आकारण्यात येणार आहे.