हिंदु राष्ट्रावर निष्ठा न ठेवणार्‍यांनी पाकिस्तानात चालते व्हावे ! – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदु राष्ट्राचा विचार प्रखर आणि जहाल भाषेत सतत मांडला आहे. धर्माच्या नावावर मुसलमानांसाठी पाकिस्तान निर्माण झाले. त्यामुळे आता हे केवळ हिंदु राष्ट्रच आहे.

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन हा राजकीय नव्हे, तर धार्मिक प्रश्‍न ! – श्री. राहुल कौल, अध्यक्ष, पनून कश्मीर

वर्ष १९९० मध्ये काश्मीरमधून हिंदूंना पलायन करावे लागले. हे त्यांचे पहिले नव्हे, तर गेल्या ७०० वर्षांपासूनचे सातवे पलायन आहे. मग १९९० मधील पलायन वेगळे का ? कारण त्या वेळी भारत स्वतंत्र झाला होता आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता.

राष्ट्रगीतासाठी उभे रहाण्याच्या वृत्तीतून संस्कार दिसून येतात ! – अनुपम खेर

चित्रपटाची तिकिटे घेण्यासाठी, हॉटेलमध्ये जेवणासाठी आपली कित्येक वेळ रांगेत उभी रहाण्याची सिद्धता असते. मग ५२ सेकंदांच्या राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी आपण उभे नाही राहू शकत ?

सौ. कांता माधव भट्टराय यांनी नेपाळ सरकारमध्ये संस्कृत श्‍लोक म्हणून राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली

येथील ‘राष्ट्रीय धर्मसभा नेपाळ’ या पक्षाच्या केंद्रीय सदस्या सौ. कांता माधव भट्टराय यांना नेपाळच्या महिला, बालबालिका आणि समाज कल्याण खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले हेच ईश्‍वरी राज्याची स्थापना करणार आहेत ! – प.पू. देवबाबा

परात्पर गुरु डॉक्टर आठवले हे श्रीकृष्णाचे अवतार आहेत. तेच ईश्‍वरी राज्याची स्थापना करणार आहेत. त्यामुळे त्याचे प्रतीक म्हणून सनातनचे साधक श्रीकृष्णाचे चित्र सप्तचक्रांवर उपायांसाठी लावतात, असे उद्गार कर्नाटक येथील शक्तीदर्शन योगाश्रमाचे प.पू. देवबाबा यांनी काढले.

श्री सिद्धलिंगस्वामी यांच्या अटकेच्या मागणीसाठी जमावबंदी आदेश मोडून मोर्चा काढणार्‍या एस.डी.पी.आय. संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक

आंदोला येथील श्री सिद्धलिंग स्वामी यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी जेवर्गीहून आंदोला येथे मोर्च्याद्वारे जाण्याचा प्रयत्न करणार्‍या सोशलिस्ट डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या (एस्.डी.पी.आय.च्या) २५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

गुजरातमधून अटक केलेल्या इसिसच्या आतंकवाद्यांनी २५ मुसलमान तरुणांना भडकावले !

गुजरातच्या अंकलेश्‍वर येथून अटक करण्यात आलेल्या इसिसच्या कासिम आणि उबेद या आतंकवाद्यांनी २५ मुसलमान तरुणांना भडकावले. यासाठी या दोघांनी ६ मासांमध्ये सूरत येथे ९० बैठका घेतल्या होत्या.

रायबाग (कर्नाटक) येथे सनातनच्या फिरत्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या विशेष फिरत्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन ३० ऑक्टोबर या दिवशी ‘ब्राईट लॅड शिक्षण संस्थे’चे अध्यक्ष श्री. शशिकांत कुलगुडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

आज होणार्‍या राष्ट्रीय एकता दौडीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा ! – जिल्हाधिकारी

सरदार वल्लभभाई पटेल यांचा ३१ ऑक्टोबर हा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून जिल्ह्यात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सांगली शहरात ३१ ऑक्टोबर या दिवशी ‘रन फॉर युनिटी’ ही राष्ट्रीय एकता दौड काढण्यात येणार आहे.

आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी काश्मिरी नागरिकांची सैन्यावर दगडफेक !

बंदीपोरा परिसरातील हाजिन भागातील मीर मोहल्ला येथे सैन्याकडून आतंकवाद्यांच्या विरोधात चालू असलेल्या कारवाईला स्थानिक देशद्रोही नागरिकांनी विरोध करत सैन्यावर जोरदार दगडफेक केल्याने आतंकवाद्यांना पळून जाणे शक्य झाले.


Multi Language |Offline reading | PDF