उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड राज्यांतील रेल्वे स्थानके आणि हिंदूंची धार्मिक स्थळे येथे बाँबस्फोट करण्याची धमकी

जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेच्या नावाने रेल्वे स्थानकाला पाठवले पत्र !

देहरादून व हरिद्वार रेलवे स्टेशन

हरिद्वार (उत्तराखंड) – उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड राज्यांतील अनेक रेल्वे स्थानके बाँबने उडवून देण्यात येतील, अशी धमकी देणारे पत्र हरिद्वार रेल्वे स्थानकाला मिळाले आहे. जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेकडून हे पत्र पाठवण्यात आल्याचा दावा यात करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकासह धार्मिक स्थळांनाही लक्ष्य करण्यात येणार असल्याचेही यात म्हटले आहे. हे पत्र मिळाल्यानंतर येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

 सौजन्य : Aaj Tak HD

‘जम्मू-काश्मीरमध्ये मरणार्‍या सहकार्‍यांचा सूड घेतला जाणार आहे’, असे या पत्रात म्हटले आहे. हर की पौडी, भारतमाता मंदिर, चंडीदेवी, मनसादेवी यांच्यासह हरिद्वारमधील प्रमुख मंदिरे, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ आदी ठिकाणी बाँबस्फोट करण्यात येतील, असे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

  • आतंकवाद्यांना धर्म असतो, हेच या धमकीतून लक्षात येते !