तैवान कधीही चीनचा भाग राहिलेला नाही ! – तैवान

तायपेय (तैवान) – तैवान हा एक सार्वभौम देश आहे. तैवान कधीही चीनचा भाग राहिलेला नाही. आमच्या देशातील नागरिक वर्ष १९९२ मध्ये चीन आणि तैवान यांचे तत्कालीन सरकार यांच्यात झालेल्या सर्वसंमतीचा कधीही स्वीकार करणार नाहीत. तैवानमध्ये हाँगकाँगप्रमाणे देश आणि दोन प्रणाली ही पद्धत कधीही लागू होऊ शकत नाही. तैवानचे भविष्य आमच्या नागरिकांच्या हातात आहे, अशी प्रतिक्रिया तैवानच्या सरकारी  परिषद असलेल्या मेनलँड अफेयर्स कौन्सिलने शी जिनपिंग यांच्या विधानावर व्यक्त केली आहे.