डॉक्टरांनी औषधाच्या चिठीवर (प्रिस्क्रिप्शनवर) ‘श्री हरि’ लिहावे !

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आवाहन !

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

भोपाळ (मध्यप्रदेश) – डॉक्टरांना साधे ‘क्रोसिन’ औषध लिहून द्यायचे असेल, तर त्यांनी थेट हिंदीतच ‘क्रोसिन’ लिहून द्यायला हवे. तसेच प्रिस्क्रिप्शनवर (औषध लिहून देण्यात येणार्‍या चिठीवर) ‘श्री हरि’ असेही लिहिले पाहिजे, असे आवाहन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. ‘प्रिस्क्रिप्शनच्या वरच्या बाजूला जेथे ‘Rx’ असे लिहिलेले असते त्याच्या जागी ‘श्री हरि’ लिहावे’, असे ते म्हणाले.

सौजन्य : Times Of India