हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सर्वत्र अमली पदार्थांचे सेवन करणारे आहेत ! – योगऋषी रामदेवबाबा यांचा दावा

योगऋषी रामदेवबाबा

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा नुकतेच अमली पदार्थाचे सेवन करत असल्याच्या कारणामुळे कारागृहात जाऊन आला, तर अभिनेता सलमान खान हासुद्धा अमली पदार्थ घेतो. आमीर खान याच्याविषयी ठाऊक नाही. कित्येक मोठमोठे अभिनेते अमली पदार्थांचे सेवन करतात. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सर्वत्र अमली पदार्थांचे सेवन करणारे आहेत. हिंदी चित्रपटसृष्टी आणि राजकीय क्षेत्र या ठिकाणी अमली पदार्थांचा वापर होतो, तर मतदानाच्या वेळी दारूचे वाटप केले जाते. ऋषि-मुनींच्या या पवित्र भूमीला सर्वांनी व्यसनमुक्त करून पुन्हा पवित्र केले पाहिजे, असे आवाहन योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे आयोजित ‘नशामुक्त भारत अभियाना’त केले.