संभाजीनगर येथे एस्.टी गृहनिर्माण संस्थेत ८ लाखांचा अपहार !

एस्.टी. मध्यवर्ती कार्यशाळा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मालमत्तेची परस्पर खरेदी-विक्री करून तत्कालीन अध्यक्ष आणि सचिव यांनी संस्थेत ८ लाख रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी या दोघांच्या विरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नागपूर येथे हनुमान मंदिरातील गदा घेऊन जाणार्‍या चोरट्याने गदा परत आणून दिली !

चोरट्याने हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर प्रसादही ग्रहण केला; मात्र प्रदक्षिणा घालतांना हनुमंताची पितळ्याची गदा चोरून नेली होती. त्या चोरट्याने हनुमंताच्या गदेसह पूजेचे इतर काही साहित्य पळवले होते.

नागपूर येथे श्वानाने रस्त्यावर घाण केल्यास मालकावर कारवाई !

नागपूर महानगरपालिकेने नुकतेच सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे, थुंकणे, तसेच कचरा फेकणार्‍यांवर कारवाई चालू केली आहे. आता पुढच्या टप्प्यात शौचासाठी पाळीव श्वानांना रस्त्यांवर घेऊन येणार्‍या श्वानमालकांवर दंड आकारण्याची सिद्धता महानगरपालिकेने केली आहे.

भारतात आता ३ जी आणि ४ जी भ्रमणभाष संचांची निर्मिती होणार नाही !

भ्रमणभाष संच उत्पादक आस्थापनांनी १० सहस्र रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे ३ जी आणि ४ जी इंटरनेटची सुविधा असलेल्या स्मार्टफोनचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोमीनपूर (कोलकाता) येथील हिंसाचारात ‘अल् कायदा’ आणि ‘इसिस’ यांचा हात ! – शुभेंदू अधिकारी, विरोधी पक्षनेते, बंगाल

कोलकाताच्या मोमीनपूर भागात झालेल्या हिंसाचारात ‘अल् कायदा’ आणि ‘इसिस’ यांचा हात आहे, असा दावा बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांनी नुकताच केला.

मुसलमानांनी हिंदू महिलांच्या हातावर मेंदी काढल्यास परिणाम भोगावे लागतील !

‘मेंदीची दुकाने उघडणार्‍या मुसलमान तरुणांचे उद्देश वेगळे आहेत. त्यांच्या डोक्यात ‘लव्ह जिहाद’ आहे. त्यामुळे मुसलमानांनी हिंदू महिलांच्या हातांवर मेंदी काढल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील’, अशी चेतावणी देण्यात आली आहे.

मंगळुरू (कर्नाटक) येथे पी.एफ्.आय.च्या ठिकाणांवर धाडी : ५ जण कह्यात !

१३ ऑक्टोबर या दिवशी कर्नाटकातील मंगळुरू येथे काही ठिकाणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (‘एन्.आय.ए.’कडून) धाडी टाकण्यात आल्या.

नेपाळ सीमेवरील मदरशांमध्ये घुसखोरी करण्याचा बांगलादेशी आतंकवाद्यांचा प्रयत्न

‘जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जे.एम्.बी.)’ या आतंकवादी संघटनेचे आतंकवादी नेपाळ सीमेजवळ असलेल्या मदरशांद्वारे भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत असल्याची माहिती समोर आली आहे.

सणांच्या काळात प्रवाशांची लूट करणार्‍या खासगी वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा आदेश

यंदाच्या वर्षीची दिवाळी निर्बंधमुक्त असल्याने प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीच्या हंगामात प्रवाशांना तक्रार नोंदवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक घोषित करण्यात आला आहे.

मुंबईत शांतता बिघडण्याच्या शक्यतेने ऐन दिवाळीत जमावबंदी लागू  !

केंद्रात आणि राज्यात हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना प्रत्येक वेळी हिंदूंंना आतंकवादाच्या सावटाखाली सण साजरे करावे लागणे, हे कितपत योग्य आहे ?