‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था भारतामध्ये तात्काळ बंद करा !

हलालसक्ती विरोधी कृती समितीची निवेदनाद्वारे मागणी !

अकोला येथे रजिस्ट्रार श्रीमती मीरा पागोरे यांना निवेदन देतांना कृती समितीचे संजय धनाडे, मुकुंद जालनेकर, विद्याधर जोशी, श्रुती भट, अश्विनी सरोदे, योगेश अग्रवाल

अकोला, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – सध्या प्रत्येक पदार्थ आणि वस्तू हलाल असल्याची मागणी काही लोकांकडून केली जात आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष भारतात केवळ धर्माच्या आधारावर हलाल प्रमाणपत्र व्यवस्था हिंदूंसह अन्य समाजघटकांवर लादण्यात येत आहे. बहुसंख्यांक हिंदु समाजाला हलाल प्रमाणित उत्पादने घ्यायला लावणे, हे हिंदूंच्या धार्मिक अधिकारांचे हनन आहे. त्यामुळे हलाल प्रमाणपत्र व्यवस्थेवर भारतात तात्काळ बंदी आणावी आणि हे प्रमाणपत्र देणार्‍या संघटनांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी हलालसक्ती विरोधी कृती समितीच्या अकोला शाखेने केली आहे, याविषयीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने रजिस्ट्रार श्रीमती मीरा पागोरे यांनी स्वीकारले. चिखली येथेही वरील विषयाचे निवेदन नायब तहसीलदार वैभव खाडे यांना देण्यात आले. हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे.

चिखली येथील नायब तहसीलदारांना निवेदन देतांना कृती समितीचे सदस्य

हलालसक्ती विरोधी कृती समिती कार्यरत !

शहरातील काही हिंदुत्वनिष्ठ संघटक, उद्योजक आणि धर्माभिमानी नागरिक यांनी हलालसक्ती विरोधी कृती समितीच्या अकोला आणि चिखली शाखांची स्थापना केली. हलाल प्रमाणपत्र जोपर्यंत भारतातून बंद होत नाही, तोपर्यंत ही समिती कार्यरत रहाणार आहे. समितीच्या माध्यमातून हलाल षड्यंत्र सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी व्यापक प्रबोधन करण्यात येणार आहे.