पंतप्रधानांच्या विरोधात अपशब्द वापरणे अपमानास्पदच; पण देशद्रोह नाही ! – कर्नाटक उच्च न्यायालय

‘पंतप्रधानांना जोड्याने मारले पाहिजे’ असे अपशब्द उच्चारणे, हे केवळ अपमानास्पदच नाही, तर ती दायित्वशून्यताही आहे. सरकारी धोरणावर विधायक टीका करण्याची अनुमती आहे; परंतु घटनात्मक पदावर असलेल्यांचा अनादर केला जाऊ शकत नाही’ – न्यायमूर्तींचे निरीक्षण

रशियाचे खासगी सैन्य वॅगनर ग्रुप आणि त्याचे प्रमुख प्रिगोझिन गायब !

बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अ‍ॅलेक्झेंडर लुकाशेंके यांनी ६ जुलै या दिवशी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनी सांगितले की, प्रिगोझिन आणि त्यांचे खासगी सैन्य बेलारूसमध्ये नाहीत.

मुर्शिदाबादमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या !

बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच जनहिताचे आहे !

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांवर गावठी बाँब आणि गोळीबार यांद्वारे आक्रमण : ४ जण घायाळ

कूचबिहार येथील दिनहाटा गावात भाजपच्या कार्यकर्त्यांवर गावठी बाँबद्वारे आक्रमण करण्यात आल्याचे, तसेच गोळीबारही करण्यात आल्याची घटना घडली. यात ४ कार्यकर्ते घायाळ झाले आहेत. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

राहुल गांधी यांनी त्यांच्या शिक्षेला दिलेली आव्हान याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली

‘मोदी आडनाव असणारे सर्व जण चोर असतात’, असे विधान केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायालयाने २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

विवाहपूर्वी नोकरी करणार्‍या महिलेने घटस्फोटानंतर पतीकडून पूर्ण पोषणाचा खर्च मागू नये ! – कर्नाटक उच्च न्यायालय

विवाहापूर्वी नोकरी करणारी महिला घटस्फोट घेतल्यानंतर काम न करता बेरोजगार म्हणून घरी बसू शकत नाही आणि पतीकडून पूर्ण पोटगीही मागू शकत नाही. तिने तिचा चरितार्थ चालवण्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजे, असे मत कर्नाटक उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना व्यक्त केले.

उदयपूरमधील ऐतिहासिक आणि सर्वांत मोठ्या मंदिरात वस्त्रसंहिता लागू !

देशातील एकेका मंदिराने असे करत बसण्यापेक्षा देशपातळीवरच असा निर्णय सर्व मंदिरांचे विश्‍वस्त आणि मंदिर समिती यांनी घेतला पाहिजे ! यासाठी मंदिरांचा एक देशव्यापी महासंघच स्थापन करण्याची आवश्यकता आहे !

(म्हणे) ‘भारतात शरीयत राजवट लागू होणार !’ – मौलाना तौकीर अहमद

‘तबलिगी जमात’चे मौलाना तौकीर अहमद यांचे फुत्कार ! थेट पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इस्लाम स्वीकारण्याचे निमंत्रण देण्याचे धाडस दाखवणारे मौलाना सर्वसामान्य हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करत नसतील कशावरून ?

सर्वोच्च न्यायालयाचेे विश्‍वविद्यालय अनुदान आयोगाला निर्देश !

उच्च शैक्षणिक संस्थांमधील अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या विद्यार्थ्यांना भेदभावरहित आणि मुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत ? किंवा कोणती पावले उचलण्याचा प्रस्ताव आहे ? याची माहिती द्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विश्‍वविद्यालय अनुदान आयोगाला (‘यूजीसी’ला) दिले.

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याचा नवा व्हिडिओ प्रसारित झाल्याने तो जिवंत असल्याचा दावा !

‘सिख फॉर जस्टिस या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी आतंकवासी संघटनेचा नेता गुरपतवंत सिंग पन्नू याचा अमेरिकेत वाहन अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. या वृत्ताला कुणीही दुजोरा दिला नव्हता. आता त्याचा ५ जुलैला एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे.