बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट कधी लागू करणार ?
कूचबिहार (बंगाल) – येथील दिनहाटा गावात भाजपच्या कार्यकर्त्यांवर गावठी बाँबद्वारे आक्रमण करण्यात आल्याचे, तसेच गोळीबारही करण्यात आल्याची घटना घडली. यात ४ कार्यकर्ते घायाळ झाले आहेत. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. भाजपने या आक्रमणासाठी तृणमूल काँग्रेसला उत्तरदायी ठरवले आहे. बंगालमध्ये ८ जुलै या दिवशी पंचायत निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हिंसाचार चालू आहे. यात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण घायाळ झाले आहेत.
#BreakingNews: 3 people shot in Cooch Behar ahead of Panchayat Polls
They are reportedly BJP workers, 1 more reported to be injured#WestBengal #PanchayatPolls #TMC #BJP #WestBengalViolence | @KuheenaSharma pic.twitter.com/RnruXOWNoO
— News18 (@CNNnews18) July 7, 2023