(म्हणे) ‘भारतात शरीयत राजवट लागू होणार !’ – मौलाना तौकीर अहमद

  • ‘तबलिगी जमात’चे मौलाना तौकीर अहमद यांचे फुत्कार !

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिले इस्लाम स्वीकारण्याचे निमंत्रण !

(मौलाना म्हणजे इस्लामी अभ्यासक)

तबलीघी जमातच्या मौलानाने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांना दिले इस्लाम स्वीकारण्याचे आमंत्रण !

नवी देहली – भारतात शरीयत राजवट लागू होणार आहे, असे विधान तबलिगी जमातचे मौलाना तौकीर अहमद यांनी केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या वेळी मौलानांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इस्लाम स्वीकारण्याचे निमंत्रण देत ‘हे दोघेही मुसलमान झाले, तर फार सुधारणा होईल. त्याचबरोबर अफगाणिस्तानप्रमाणे भारतातही शरीयत राजवट प्रस्थापित होईल’, असेही विधान केले.

मौलाना तौकीर अहमद पुढे म्हणाले की,

१. हिंदूंचे प्रमुख व्यक्तीमत्व असलेल्या योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडणे, हा आपला मुख्य उद्देश आहे.

२. मूर्तिपूजकांची दिशाभूल झाली आहे. त्यांना अल्लाच्या उपासनेकडे आणण्याची आवश्यकता आहे.

३. वर्ष २०१४ पासून देशभरात अनुमाने २० लाख मुसलमानेतरांनी इस्लाम स्वीकारला आहे. तबलिगी जमातचे सदस्य अधिकाधिक लोकांना इस्लाममध्ये धर्मांतरित करण्याचा प्रयत्न करतात. ते देशात शरीयत कायदा लागू करण्याच्या प्रयत्नांत गुंतलेले आहेत.

४. इस्लामी धर्मांतराचे जाळे देशभर पसरले आहे. त्यासाठी अरब देश आणि अफगाणिस्तान येथून पैसा येतो. या पैशांचे आमीष दाखवून हिंदूंचे धर्मांतर केले जाते. भारतातील हिंदूंच्या धर्मांतराच्या ९९ टक्के घटनांसाठी तबलिगी जमात उत्तरदायी आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदु राष्ट्राविषयी कुणी विधान केल्यावर ‘लोकशाही धोक्यात आहे’, अशी ओरड करणारे पुरोगामी आता भारतात शरीयत राजवट लागू होण्याच्या मौलानांच्या विधानाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • शरीयत राजवट लागू करून भारताचा पाकिस्तान होऊ द्यायचा नसेल, तर हिंदूंनी हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे !
  • थेट पंतप्रधान आणि एका राज्याचे हिंदुत्वनिष्ठ मुख्यमंत्री यांना इस्लाम स्वीकारण्याचे निमंत्रण देण्याचे धाडस दाखवणारे मौलाना सर्वसामान्य हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करत नसतील कशावरून ? याचीही चौकशी झाली पाहिजे !