अमृतसर (पंजाब) – ‘सिख फॉर जस्टिस या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा नेता गुरपतवंत सिंग पन्नू याचा अमेरिकेत वाहन अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. या वृत्ताला कुणीही दुजोरा दिला नव्हता. आता त्याचा ५ जुलैला एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात तो न्यूयॉकमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाबाहेर उभा राहून खलिस्तानसाठी सार्वमत घेण्याविषयी बोलत आहे. त्यामुळे तो अद्याप जिवंत आहेत, असे म्हटले जात आहे; मात्र या व्हिडिओमध्ये त्याने स्वतःच्या मृत्यूच्या वृत्ताविषयी कोणतेही विधान केलेले नसल्याने हा व्हिडिओ अपघातच्या आधीचा आहे का ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
सौजन्य हिंदुस्थान टाईम्स