सर्वोच्च न्यायालयाचेे विश्‍वविद्यालय अनुदान आयोगाला निर्देश !

उच्च शैक्षणिक संस्थांमधील अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या विद्यार्थ्यांना भेदभावरहित आणि मुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत ? किंवा कोणती पावले उचलण्याचा प्रस्ताव आहे ? याची माहिती द्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विश्‍वविद्यालय अनुदान आयोगाला (‘यूजीसी’ला) दिले.

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याचा नवा व्हिडिओ प्रसारित झाल्याने तो जिवंत असल्याचा दावा !

‘सिख फॉर जस्टिस या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी आतंकवासी संघटनेचा नेता गुरपतवंत सिंग पन्नू याचा अमेरिकेत वाहन अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. या वृत्ताला कुणीही दुजोरा दिला नव्हता. आता त्याचा ५ जुलैला एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

ज्ञानवापीतील शिवलिंगाचे लवकरात लवकर परीक्षण व्हावे ! – हिंदु याचिकाकर्त्यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी

वाराणसी येथील ज्ञानवापीतील शिवलिंगाची लवकरात लवकर वैज्ञानिक चाचणी करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली. या संदर्भात त्यांचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकांना पत्र लिहिले आहे.

सिंधुदुर्ग : पावसाळ्यातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने कोळंब ग्रामस्थ संतप्त

‘निसर्गाने दिले; पण निष्क्रीयतेमुळे गमावले’,  अशी स्थिती निर्माण करणारे प्रशासन !

राज्यसभेच्या एका जागेसाठी गोव्यात २४ जुलैला निवडणूक

भाजपकडून प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे नाव निश्चित झाले आहे, तर घोषणेची औपचारिकता केवळ बाकी आहे. विरोधी काँग्रेस पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने त्यांनी ही निवडणूक गंभीरपणे घेतलेली नसल्याचे दिसत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस

जिल्ह्यात गेले २ दिवस मुसळधार पाऊस पडत असून नदी, नाले यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच काही ठिकाणी वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

गोवा राज्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी चालूच : जनजीवन विस्कळीत

बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले चक्रीय वारे, तसेच अल्प दाबाचा पट्टा यांमुळे राज्यात ५ जुलैपासून मुसळधार पाऊस चालू आहे. हवामान खात्याने आजही येलो अलर्टची, तर पुढील ४ दिवस काही ठिकाणी ऑरेंज अलर्टची चेतावणी दिली आहे.

समर्थांसाठी श्रीरामानंतर आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

श्रीसमर्थवाग्‍देवता मंदिर, धुळे या संस्‍थेच्‍या वतीने ‘श्रीसमर्थ रामदासस्‍वामी लिखित वाल्‍मिकी रामायण’ या ग्रंथाच्‍या मूळ सात बाडांचे कांडशः संपादन करून बनवण्‍यात आलेल्‍या ८ खंडांचे राष्‍ट्रार्पण सरसंघचालकांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. त्‍या वेळी ते बोलत होते.

हिंदूंनी संघटित होऊन समाजाला जागृत करणे आवश्‍यक – डॉ. राजेंद्र दीक्षित, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

सनातन संस्‍थेच्‍या वतीने ३ जुलै या दिवशी नागपूर येथे स्‍व. तेजसिंहराव भोसले सभागृह, तुळसीबाग, महाल आणि श्रीराम मंदिर, बाजीप्रभू देशपांडे चौक, रामनगर या ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्‍सव भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. 

श्रीक्षेत्र कांदळी येथे भक्‍तीमय वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्‍सव साजरा !

श्रीक्षेत्र कांदळी येथे प्रतिवर्षीप्रमाणे ‘श्री रामचंद्र देव एवं प.पू. भक्‍तराज महाराज समाधी ट्रस्‍ट’च्‍या वतीने २ जुलै आणि ३ जुलै २०२३ या दिवशी गुरुपौर्णिमा महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते. या २ दिवसांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते.