राहुल गांधी यांनी त्यांच्या शिक्षेला दिलेली आव्हान याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली

राहुल गांधी

कर्णावती (गुजरात) – ‘मोदी आडनाव असणारे सर्व जण चोर असतात’, असे विधान केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायालयाने २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्याला गुजरात उच्च न्यायालयात गांधी यांनी दिलेले आव्हान न्यायालयाने फेटाळून लावले आहे. यामुळे आता राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात या शिक्षेला आव्हान देणार आहेत.

वर्ष २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांनी वरील विधान केले होते. त्यावरून भाजपचे नेते पूर्वेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात सूरत येथील सत्र न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. सत्र न्यायालयाने २३ मार्च २०२३ या दिवशी राहुल गांधी यांना २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर २४ मार्चला लोकसभेच्या सचिवालयाने राहुल गांधी यांना अपात्र ठरवल्याने त्यांची खासदारकी गेली होते.