बंगालमध्ये पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अराजकाची स्थिती !
मुर्शिदाबाद (बंगाल) – येथील राणीनगर परिसरात अरबिंदो मंडल नावाच्या ४५ वर्षीय काँग्रेस कार्यकर्त्याची काही अज्ञातांनी बेदम मारहाण करून हत्या केली. राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांच्या आगमनापूर्वी ही घटना घडली. पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन गटांत झालेल्या हाणामारीच्या वेळी पीडित व्यक्तीच्या घरावरही काही अज्ञातांनी आक्रमण केले होते. मारहाणीत गंभीररित्या घायाळ झालेल्या पीडित व्यक्तीला रुणालयात नेले असता आधुनिक वैद्यांनी त्याला मृत घोषित केले. परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या प्रकरणाचे अन्वेषण चालू असून अद्याप कुणालाही अटक झालेली नाही, असे एका पोलीस अधिकार्याने सांगितले.
Murshidabad, West Bengal | Governor CV Ananda Bose reached the house of Phoolchand, a Congress worker who was shot dead in Ratanpur village under the Khargram block.
Phoolchand’s family made many complaints to the Governor. The villagers demanded the Governor to get the murder… pic.twitter.com/fJTA36ZElJ
— ANI (@ANI) July 7, 2023
बंगाल राज्यातील पंचायत निवडणुका ८ जुलै २०२३ या दिवशी होणार असून त्याचा निकाल ११ जुलैला घोषित करण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिकाबंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच जनहिताचे आहे ! |