शाहूपुरी (सातारा) पोलीस निरीक्षकपदी मुंबई येथील धनंजय फडतरे यांची नियुक्ती !

फडतरे हे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले गावचे असून त्यांनी कराड महामार्ग पोलीस विभागात, तसेच मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांतील विभागांत सेवा केली आहे.

पुणे येथील अष्टांग योगी संत श्री शिवोकांत स्वामीजी यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

या वेळी स्वामीजी म्हणाले, ‘‘हिंदु धर्मासाठी संघटित होऊन लढा द्यायला हवा. अहंकारी राज्यकर्त्यांनी सत्तेच्या स्वार्थापोटी हिंदु धर्माची अनन्वित हानी केली आहे. सात्त्विक लोकांना धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी संघर्ष करावा लागतो.’’

‘लोकमान्य टिळक’ पुरस्कार देण्यावरून वाद निर्माण !

‘लोकमान्य टिळक’ राष्ट्रीय पुरस्कार मोदींना देण्यास काँग्रेस, सेवा दल, इंटक या संघटना, तसेच आम आदमी पक्ष आणि युवक क्रांती दलाने विरोध दर्शवला आहे.

अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याचा पदभार !

राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ आमदारांनी २ जुलै या दिवशी मंत्रीपदाची शपथ घेतली होती, या सर्व मंत्र्यांची खाती घोषित करण्यात आली. यासह पूर्वीच्या काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये पालट करण्यात आला.

‘अनंत प्लास्टिक सर्जरी’च्या वतीने रविवारी स्नेहमेळावा ! – डॉ. मयुरेश देशपांडे, प्लास्टिक सर्जन

संकटग्रस्त रुग्णांना, त्यांचा जीव अथवा त्यांचे तुटलेले हात-पाय-बोटे वाचवण्याच्या दृष्टीने समायोचित मार्गदर्शन करणार्‍या समाजातील देवदूतांचा गौरव करण्यासाठी रविवार, १६ जुलैला सकाळी ११ वाजता ‘रेसिडन्सी क्लब नागाळा पार्क’ येथे स्नेहमेळावा आयोजित केला आहे.

उरुळी कांचन (पुणे) येथील एका हिंदु मुलीवर १५ दिवस २ मुसलमानांकडून बलात्कार !

धर्मांधांकडून हिंदु मुलींवर अत्याचार करण्याचे प्रमाण वाढले आहे. जेव्हा अशा घृणास्पद कृत्याला फाशीची शिक्षा करण्यात येईल, तेव्हाच गुन्हा करणार्‍याच्या मनात जरब निर्माण होऊन अशा गुन्ह्याला आळा घालता येईल !

कराड येथील श्री उत्तरालक्ष्मी मंदिराच्या मिळकतीवर वक्फ बोर्डाचा डोळा !

श्री उत्तरालक्ष्मी मंदिर परिसरातील जागेवर मुसलमान समाजाची स्मशानभूमी आहे. ती मूळची गायरान पैैकी भूमी असून सातारा जिल्हाधिकारी यांचे हु.नं. एल्.एन्.डी./२४००/१९३१ अन्वये मुसलमान स्मशानभूमीकडे ठेवण्यात आलेली (असाईन) आहे.

चिपळूण येथील नवीन वाशिष्ठी पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे ! – निहार कोवळे, युवासेना तालुकाप्रमुख

युवासेनेचे आदित्य जोशी यांच्या पुलाच्या खालील काही भाग खचलेला दिसला. त्यांनी ती माहिती तात्काळ कोवळे यांना कळवली. त्यानंतर या पुलाची कोवळे यांनी पहाणी केली होती.

आतंकवादी संघटना धर्माची प्रतिमा मलिन करतात ! – ‘वर्ल्ड मुस्लिम लीग’चे प्रमुख अल्-ईसा

एकीकडे अल्-ईसा हे आतंकवादी संघटना धर्माची प्रतिमा मलिन करत असल्याचे विधान करतात, तर दुसरीकडे आतंकवादी संघटनांना धर्म किंवा देश नसतो, असेही म्हणतात ! या परस्परविरोधी वक्तव्यांतून अल्-ईसा यांचा दुटप्पीपणा उघड होतो !

गड-दुर्गांचे पावित्र्य जपण्यासाठी धुडगूस घालणार्‍या पर्यटकांना चेतावणी देणार्‍या सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांचे अभिनंदन !

गड–दुर्ग ही पर्यटन स्थळे नव्हेत, तर क्षात्रवीरांची तीर्थस्थळे आहेत, हे लक्षात घ्या. गडांचे पावित्र्य राखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना चेतावणी द्यावी लागते , हे प्रशासनाला लज्जास्पद !